Mutual fund मध्ये गुंतवणून करून श्रीमंत व्हा ……..

नमस्कार,

           श्रीमंत होण ही कुणाच स्वप्न नसत ! प्रत्येकजण मेहनत पैशासाठी करतो पण श्रीमंत होण्यासाठी फक्त मेहनत नाही तर हुशारी लागते ,त्यासाठी माणूस आर्थिक साक्षर लागतो . त्यासाठी पैशाची बचत तर महत्वाची आहेच पण सोबत सुरक्षित गुंतवणूक फार महत्वाची वाढती महागाईमुळे आपले पैसे त्याची किंमत कमी करत आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला स्मार्ट गुंतवणुकीचा मार्ग दाखवत आहोत.

म्यूचुअल फंड म्हणजे काय ? 

What is mutual fund ?

 

      Mutual fund म्हणजे हजारो लोकाकडून थोडे थोडे पैसे जमा करतात व तज्ञाच्या मार्फत तो पैसा शेअर्स व बॉन्ड मध्ये गुंतवून त्यावर जास्तीत जास्त नफा परतावा मिळवला जातो. Mutual fund चा फायदा असा आहे की तुमचे पैसे एकाच कंपनीत न लावता वेगवेगळ्या कंपण्यामधे गुंतवला जातो त्यामुळे एक कंपनीत नुकसान झाले की दुसरी भरून काढते त्यामुळे जोखीम कमी होते व चांगला परतावा मिळतो. 

 

Mutual fund चे मुख्य प्रकार 

Types of Mutual fund

  • Equity fund :- यामध्ये आलेला पैसा तज्ञाचे सहयाने थेट शेअर मार्केट मध्ये गुंतवला जातो त्यामुळे यावर परतावा खूप जास्त मिळतो पण Equity fund मध्ये जोखीम पण जास्त असते 
  • Debt fund :- या मध्ये आपले पैसे सरकारी बॉन्ड मध्ये गुंतवले जातात त्यामुळे परतावा कमी मिळाला तरी जोखीम कमी असते व परतावा स्थिर असतो त्यामुळे डेब्ट फंड सुरक्षित मानला जातो 
  • Hybrid funds  :- शेअ र मार्केट व बॉन्ड दोनहीचे मिश्रण असते त्यामुळे या फंड मध्ये जोखीम मध्यम असते 

Mutual fund गुंतवणूक कशी करावी 

How to invest in Mutual fund

  • गुंतवणूक करण्यासाठी आपले एक Demat Account खाते असणे आवश्यक आहे Mutual fund मध्ये दोन प्रकारे गुंतवणूक केली जाते Lumpsum आणि SIP  
  • SIP Systematic Investment Plan :- ही पद्धत माध्यम वर्गीयांसाठी खूप फायदेशीर आहे यामध्ये दरमहा ठराविक रक्कम आपल्या बँक खत्यातून Auto debit होते . हा पर्याय पगारातून बचतीसाठी फायदेशीर आहे.  
  • Lumpsum (एकरकमी) :- जर मोठी रक्कम असेल तर ती एकाच वेळी ठराविक mf मध्ये गुंतवली जाते Fixed deposit पेक्षा हा पर्याय उत्तम व जास्त परतावा देणारा आहे.  

Mutual fund चे फायदे :-

  • Mutual fund  मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज पडत नाही. सुरुतील फक्त १०० ते ५०० सारख्या छोट्या रकमेपासून सुद्धा गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो. 
  • महागाई वर मात करण्यासाठी Mutual fund हा उत्तम पर्याय आहे. 
  • Mutual fund म्हणजे पैशाचे व जास्त परतावा चे आमिष दाखवणारी स्कीम नाही तर SEBI(Securities and Exchange Board of India) या सरकारी संस्थेच्या नियंत्रणात चालते म्हणून Mutual fund ही सुरक्षित आणि पारदर्शक गुंतवणूक आहे.  
   

Mutual fund हा श्रीमंत होण्याचा मार्ग 

        Mutual fund श्रीमंत होण्याचा प्रभावी व सर्वात सोपं मार्ग आहे यात तुम्हाला मेहनत करायची जास्त गरज पडत नाही फक्त शिस्त आणि Power of  Compounding तुम्हाला श्रीमंत बनवेल पण त्यासाठी संयम खूप महत्वाचा जेव्हडा जास्त संयम तेव्हडा जास्त परतावा .

Power of  Compounding म्हणजे ही एक अशी जादू आहे जी आपली संपत्ति Welth संयम व वेळ दिला तर खूप वेगाने परतावा देते. आपला पैसा दिवस रात्र परतावा देत राहतो पैशाने पैसा वाढत जातो त्यामुळे पुढील काळात आपल्याला खूप मोठी संपत्ति दिसेल 

How to invest in mutual fund 
what is mutual fund
mutual fund invstment
mutual fund in marathi
investment ideas marathi
marathi investment mutual fund

 

Leave a Comment